नाशिक लोकसभा निवडणुकीची रंगत वाढणार, ‘या’ माजी महापौरने केली उमदेवारी घोषित!

| Updated on: Jun 02, 2023 | 1:14 PM

लोकसभा निवडणुकासाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आता नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीवरून माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकासाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आता नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीवरून माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. आपण कोणाकडून निवडणूक लढणार याचा खुलासा लवकरच होईल, पण नाशिककरांच्या आग्रहास्तव आपण मैदानात उतरल्याचं दशरथ पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच वेळ आल्या षटकार मारणार अशी, भूमिका दशरथ पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची रंगत वाढणार आहे. आता दथरथ पाटील कुणाच्या तिकीटावर निवडणूक लढवार याची उत्सुक्ता वाढली आहे.

Published on: Jun 02, 2023 01:14 PM
Maharashtra SSC Result 2023 : राज्याचा 10 वीचा निकाल 93.83 टक्के, यंदा कुणी मारली बाजी?
“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”