गद्दारांच्या गाड्या फोडण्याची भावना सगळ्याच शिवसैनिकांमध्ये आहे
राज्यातील जे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांच्या मनात प्रत्येक बंडखोर आमदारांविषयी त्यांच्या मनात भावना तीव्र आहेत, त्यामुळे गाड्या फोडण्याचे समर्थन नसले तरी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात असा राग असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसैनिकांच्या भाषणासंदर्भात जे गुन्हे दाखल केले जात आहेत, ते सूडाच्या राजकारणापायी गुन्हे दाखल केले जात असल्याची टीका शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी व्यक्त केले. ज्या प्रकारे शिवसैनिकांवर गुन्हे केले जात आहेत, ते चुकीचे असून गद्दार आमदारांबद्दलच्या भावना असल्याचेही सांगितले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, पुण्यात ज्या प्रकारे आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला ती खऱ्या शिवसैनिकाची प्रतिक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील जे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांच्या मनात प्रत्येक बंडखोर आमदारांविषयी त्यांच्या मनात भावना तीव्र आहेत, त्यामुळे गाड्या फोडण्याचे समर्थन नसले तरी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात असा राग असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 04, 2022 08:29 PM