दाऊद इब्राहिमच्या टोळीतला एक अटकेत, खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग सुरु होतं?
रियाज भाटीला अंधेरीतून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर अटक करून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याच्या कोठडीची मागणी यावेळी केली जाईल.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गँगमधल्या एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime branch) खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रियाझ भाटीला (Riyaz bhati) पोलिसांनी अटक केली असून तो दाऊद इब्राहिमच्या जवळचा असल्याचं म्हटलं जातंय. एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रियाज भाटीला अंधेरीतून ताब्यात घेण्यात आलं. आज त्याला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. गँगस्टर छोटा शकीला याचा साडू सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांनी वर्सोवा येथील एका फिर्यादी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याच्याकडून खंडणी स्वरुपात 30 लाख रुपयांची गाडी आणि काही लाख रुपये रोख रक्कम उकळली होती, असे आरोप आहेत.
Published on: Sep 27, 2022 10:04 AM