पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी एका दिव्यांग कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हातात एक चेक ठेवला. चेकवरील नाव वाचून अजितदादांनी लागलीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं चालू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या.