Video : देशातील प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातंय- अजित पवार
ज्या मंत्र्यांनी कोरोनाकाळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी बिले दाखवली, त्यांना विचारा. माझे बिल मी दिले, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्यानंतर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. हे सर्व मंत्री जनतेच्या पैशातूनच उपचार घेत होते. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी आपली बाजू मांडली. […]
ज्या मंत्र्यांनी कोरोनाकाळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी बिले दाखवली, त्यांना विचारा. माझे बिल मी दिले, असे परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्यानंतर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. हे सर्व मंत्री जनतेच्या पैशातूनच उपचार घेत होते. याविषयी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी आपली बाजू मांडली. मी माझे बिल दिले. ज्यांनी अशाप्रकारे उपचाराच्या नावाखाली सरकारी बिले दिली, त्यांना विचारावे असे मत व्यक्त केले. कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona) मुंबईसह (Mumbai) राज्यात अनेक ठिकाणी बेडचा तुटवडा झाला होता. अनकांना बेड मिळणे दुरापस्त झाले होते. लोकांमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र, त्याचवेळी राज्याचे मंत्री मात्र कोरोना झाल्याने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार घेत होते. त्यावर मोठा वादंग उठला होता.