गृहनिर्माण खात्याची सूत्र स्विकारल्यानंतर फडणवीसांना बोलावली महत्वपूर्ण बैठक

| Updated on: Sep 28, 2022 | 10:09 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार आहेत.

गिरीश गायकवाड, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार आहेत. फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याचीही जबाबदारी आहे. वांद्रे येथील म्हाडा भवनमध्ये फडणवीस आढावा बैठक घेणार आहेत.गृहनिर्माण पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री ‘म्हाडा’च्या (MHADA) कार्यालयात येत असल्याने या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे.या बैठकीत म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळ पुनर्विकास, सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास, मोतीलाल नगर पुनर्विकास यासह विविध प्रकल्पांवर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 28, 2022 10:06 AM
36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM
चांदणी चौकातील पुलाच्या पाडकामाच्या तयारीला सुरुवात, पाहा व्हीडिओ…