DCM Eknath Shinde : ‘मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?’, ‘एसंशिं’ वर एकनाथ शिंदे संतापले

DCM Eknath Shinde : ‘मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?’, ‘एसंशिं’ वर एकनाथ शिंदे संतापले

| Updated on: Apr 03, 2025 | 5:11 PM

Thackeray - Shinde Dispute : 'एसंशिं' या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अपभ्रंशावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.

उद्धव ठाकरेंच्या यांच्या ‘एसंशिं’ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युज अँड थ्रो असं उत्तर देण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘एसंशिं’च्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी आज संतापून उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एसंशिं’ म्हणजे काय? मी युटी म्हणू का? युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का? असं शिंदेंनी म्हंटलं आहे. वापरा आणि फेका ही त्यांची नीति आहे. मला बोलायला लावू नका, असंही शिंदेंनी यावेळी म्हंटलं आहे. घर का ना घाट का अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था झाली असल्याचंही शिंदेंनी म्हंटलं आहे.

Published on: Apr 03, 2025 05:11 PM
Chandrakant Khaire : शिवसेनेत कुरबुर! ‘दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का?’, चंद्रकांत खैरेंची नाराजी
Adv. Gunratna Sadavarte : राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले