नितीन देसाई यांच्या निधनामुळे ‘लालबागचा राजा’ मंडळाचं मोठं नुकसान!
प्रसिद्ध कला दिग्दर्शक, अभिनेते नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनचा धक्का बसला.नितीन देसाई यांच्या निधनामुळे लालबाग राजा मंडळाच मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कला दिग्दर्शक, अभिनेते नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनचा धक्का बसला.नितीन देसाई यांच्या निधनामुळे लालबाग राजा मंडळाच मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, “आमच्यासाठी ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. ते रविवारी आमच्यासोबत जवळपास दोन तास त्यांच्या टीमसह मंडपाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यावेळी ते अगदी सामान्य होते. असं काही घडू शकतं याचा कोणताही मागमूस नव्हता. नितीन देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि 2009 पासून ते आमच्याशी जोडले गेले आहेत. मध्यंतरी एके वर्षी त्यांची प्रकृती ठीक नसताना त्यांनी मंडपरचना केली नव्हती. पण 2009 नंतर ते सतत आमच्यासोबत काम करत होते. त्यांनी नेहमी वेळेवर काम पूर्ण केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुक सर्वांकडून झालं.”