संभाजी भिडे यांच्याविरोधात यशोमती ठाकूर आक्रमक; ट्विटरवरून आली थेट जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना काल जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती. तर धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
अमरावती, 31 जुलै 2023 | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रम भूमिका घेतल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना काल जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती. तर धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना ही धमकी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी थेट सरकारलाच इशारा देताना माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल असं म्हटलं आहे.
Published on: Jul 31, 2023 12:06 PM