“पुण्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी लढू द्या, जिंकणार तर भाजपच”,शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्या दावा
पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा भाजपच जिंकणार असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. या जागेवरून मविआमध्ये एकमत नाही, पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी लढू द्या, जिंकणार तर भाजपच असे दीपक केसरकर म्हणाले.
मुंबई :
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत, तर दुसरीकडे भाजपच्यावतीने या जागेवर आपणच जिंकणार असा दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा भाजपच जिंकणार”, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. “या जागेवरून मविआमध्ये एकमत नाही, पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी लढू द्या, जिंकणार तर भाजपच”, असे दीपक केसरकर म्हणाले. “तर शिल्लक राहिलेले आमदार टिकवण्यासाठी विनायक राऊत यांचं हे वक्तव्य असल्याचही” दीपक केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला होता.
Published on: May 30, 2023 11:02 AM