“…तर संजय राऊत यांनी तक्रार करावी”, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील आरोपांवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 23, 2023 | 10:16 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाणे, कल्याण डोंबिवलीमधील कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. "ठाणे, कल्याण आणि डोंबिवली मधल्या कोव्हिड सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातले लोक कमिशन घेत होते. कल्याण- डोंबिवलीमधील ऑक्सिजन पुरवठादार कंपनीत खोटी बिलं देऊन पैसे काढलेले आहेत.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाणे, कल्याण डोंबिवलीमधील कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. “ठाणे, कल्याण आणि डोंबिवली मधल्या कोव्हिड सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातले लोक कमिशन घेत होते. कल्याण- डोंबिवलीमधील ऑक्सिजन पुरवठादार कंपनीत खोटी बिलं देऊन पैसे काढलेले आहेत. ते तुमच्या व्यासपीठावर आहेत. साडेपाच ते साडेसहा लाखांची खोटी बिलं ठाणे-कल्याण महापालिकेतून देण्यात आली आहेत. यात 40 टक्के कट मारण्याl कोणाचा मुलगा आहे. हे जरा समजून घ्या आणि मग आमच्याकडे बोट दाखवा. यासंदर्भात पुरावे मी ईडीकडे देणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले. या आरोपांना शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ठाणे, कल्याण-डोंबिवली महानगपालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर संजय राऊत यांनी तक्रार करावी. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही म्हण संजय राऊत यांना लागू होते. संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेतील कोव्हिड घोटाळ्यात युवासेनेतील पदाधिकाऱ्यांची नावं आली आहेत,” असं दीपक केसरकर म्हणाले.

Published on: Jun 23, 2023 10:16 AM
“2024 ला जनता शिंदे सरकारवर बुलडोझर फिरवणार”, ठाकरे गटाची प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या आरोपांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “होय झाकीर नाईकने…”