सत्यजीत तांबे विजयी होणारच, आम्हाला विश्वास!; सरकारमधील मंत्र्याचं विधान
शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सत्यजित यांच्या विजयावर विश्वास व्यक्त केलाय. पाहा...
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होतेय. उद्या या जागेसाठी मतदान होणार आहे. इथं सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील असा सामना होणार आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. सत्यजित यांना भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. आता शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सत्यजित यांच्या विजयावर विश्वास व्यक्त केलाय. सत्यजीत तांबे यांचा नाशकातून विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं केसरकर म्हणालेत.