“गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण …,” दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला पाठिंबा?

| Updated on: Jun 20, 2023 | 3:01 PM

ठाकरे गट आज गद्दार दिन साजरा करत आहेत, यावरून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "त्यांनी गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतली आहे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यामुळे त्यांनी गद्दार दिवस साजरा करावा."

मुंबई : ठाकरे गट आज गद्दार दिन साजरा करत आहेत, यावरून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “त्यांनी गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतली आहे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यामुळे त्यांनी गद्दार दिवस साजरा करावा.” “तसेच हळूहळू खरं स्वरूप या बंडाचं लोकांसमोर येत आहे. हे बंड पैशांसाठी झालेला नाही आहे, हे बंड स्वाभिमानासाठी झालेला आहे. मराठी माणसाला स्वाभिमान कोणी शिकवला तो बाळासाहेबांनी शिकवला. मागच्या वर्धपाना दिवशी उद्धव साहेबांनी कोणाचा अपमान केला हे सगळ्या महाराष्ट्राने बघितला आहे, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या नादी लागून ज्याप्रमाणे शिवसेनेचे खच्चीकरण केलं होतं ते शिवसैनिकांना मान्य नव्हतं म्हणून हा उठाव झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार आहेत हे रस्त्यावरती दोन- तीन महिने उभे असतात कोण अपमान सहन करणार आहेत. मी एवढा मोठा ऑफर सोडून शिवसेनेत का आलो तर बाळासाहेब ठाकरे यांचा हा पक्ष आहे म्हणून मी या ठिकाणी आलोय. मराठी माणसाला आधार दिला त्यासाठी मी या पक्षात आलोय.बाळासाहेब ठाकरे बोलले होते मला एक दिवस पंतप्रधान करा मी 370 कलम रद्द करतो, मी राम मंदिर बांधून दाखवतो. आज ते स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केलं. बाळासाहेबांबद्दल मोदींना किती आदर आहे हे मी डोळ्यांनी बघितलं आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले.

Published on: Jun 20, 2023 03:01 PM
अंबादास दानवे यांच्या आरोपाला शंभूराज देसाई याचं आव्हान; म्हणाले, ‘तर पुराव्यांसह…’
‘कलाकारांची किंमत सरकारला नाही’; राज ठाकरे यांची घणाघाती टीका