उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचं कारण समजू शकतो, पण आदित्य ठाकरे तरी कुठे…; केसरकरांचा पलटवार
आदित्य ठाकरे यांच्या खंजीर खुपसण्याच्या वक्तव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
अहमदनगर : उद्धव ठाकरे आजारी असताना पाठीत खंजीर खुपसण्यात आला. आमदारांनी बंडखोरी केली, असं पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आदित्य यांच्या या वक्तव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.”उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची अडचणी होती हे आम्ही समजू शकतो. पण आदित्य ठाकरे तरूण आहेत. मात्र ते स्वत: तरी कुठे मंत्रालयात गेलेत? आणि आता खोक्यांबद्दल शंभर टक्के खोटं बोलत फिरत आहेत”, असं केसरकर म्हणालेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, याची मला खात्री आहे. ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही. त्यांना अन्य ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल”, असं केसरकर म्हणालेत.