उद्धव ठाकरे तुम्ही स्वत:चा पक्ष काढा; शिंदेगटातील मंत्र्याचा सल्ला
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदेगटाला मिळालं आहे. त्यावर शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. पाहा...
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही शिंदेगटाला मिळालं आहे. निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी हा निर्णय दिला. त्यावर शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे स्वत: च्या नावाचा पक्ष काढू शकतात. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. पण त्यांनी ठाकरेंच्या नावाचा पक्ष काढला नाही. स्वतःच्या पलीकडे शिवसैनिक आहे याचा विसर उद्धव ठाकरे यांना पडलाय, असं केसरकर म्हणालेत. शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा सत्याचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेचा विजय आहे. उद्धव ठाकरे जे बोलले ते दुर्दैवी आहे. आम्ही कुणालाही दुखावलेलं नाही. काल उद्धव ठाकरेंची जीभ खूप वेळा घसरली.ते जे बोलले त्याला उत्तर देणंही योग्य नाही, असंही केसकर म्हणालेत.
Published on: Feb 18, 2023 10:30 AM