दीपक केसरकरांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, गुवाहाटीमध्ये दाखल
शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी देखील एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला असून, ते गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांना तब्बल 46 आमदारांचे समर्थन आहे. आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी देखील एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला असून, ते गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान आज दहा वाजता शिंदे गटांच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
Published on: Jun 23, 2022 10:07 AM