वारकऱ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय,देहू संस्थानकडून वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध!

| Updated on: Jun 12, 2023 | 12:39 PM

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

Follow us on

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून देहू संस्थानकडून देखील वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. काल आळंदीत वारकऱ्यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनिय आहे.प्रशासनाने आणि वारकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी,वारकरी हा सहिष्णू असतो त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अडवायला नको होतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम पोलिसांनी केल आहे. वारकरी हे पोलिसांना सहकार्य करतीलच, प्रशासनानं आत्मचिंतन कराव, या घटनेचा खोलवर तपास करावा, असं देहू विश्वस्तांनी म्हटलं आहे.