पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला, क्राईम ब्रांचकडून शोध सुरू

| Updated on: Dec 25, 2024 | 11:56 AM

माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायायलयाने फेटाळून लावला आहे. UPSC आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर असून तिच्याविरोधात दिल्ली पोलीसांत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायायलयाने फेटाळून लावला आहे. UPSC आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर असून तिच्याविरोधात दिल्ली पोलीसांत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तिने न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, मात्र पूजा खेडकर हिने फक्त आयोगाचीच नव्हे तर समाजाचीही फसवणूक केल्याचे ताशेरे ओढत दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आता दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजा खेडकरचा शोध घेण्यात येत आहे. पुण्यातील तिच्या घरालाही कुलूप असून तिचा कसून शोध घेतला जात आहे. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पूजा परीक्षेला बसली होती. त्यासाठी तिने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता. त्याचप्रमाणे, दिव्यांग असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र मिळवून निवडीसाठी विशेष सवलत मिळवली होती, असे अनेक आरोप पूजावर आहेत.

 

Published on: Dec 25, 2024 11:53 AM
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं, त्याचा काय गुन्हा होता ? बजरंग सोनावणे संतापले
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं होणार; जाणून घ्या काय आहे Farmer Digital ID