आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

| Updated on: Feb 08, 2023 | 3:17 PM

आग्र्यातील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत महत्वाचा निर्णय दिलाय.

नवी दिल्ली : आग्र्यातील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. महाराष्ट्र सरकार जर सहआयोजक होत असेल तर या जयंती उत्सवाला परवानगी देण्यात कुठलीही हरकत नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता या उत्सवासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आग्र्यातील लाल किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याकरिता पुरातत्व खात्याला परवानगी मागण्यात आली होती. औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी ही परवानगी मागितली होती. पुरातत्व खात्याच्या 2004 च्या नियमानुसार खाजगी संस्थेच्या कार्यक्रमाला परवानगी देता येत नाही. यावर आता आज दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय.

Published on: Feb 08, 2023 03:17 PM
संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणी न्यायालयाकडून जामीन मंजूर
जर्मनीचे नागरिक साईबाबांच्या चरणी; 40 भाविकांनी घेतलं दर्शन