Nana Patole | नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार, मोदींच्या वाढदिवशीच नाना पटोले यांचा घणाघात

| Updated on: Sep 17, 2022 | 3:13 PM

Nana Patole | नोटबंदी हा देशातील, जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Nana Patole | नोटबंदी ( Demonetization) हा देशातील, जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार (Scam) असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. नोटबंदी राबवून भाजपने काळा पैसा जमा केला. त्यामाध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यात भाजपची कार्यालये उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. त्यानंतर भाजपने अनेक राज्यात सत्ता स्थापन केली. आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन फोडण्यात आले, विकत घेण्यात आले. याचे ताजे उदाहरण आपण झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून आले. त्याठिकाणी दोन आमदारांना अटक करण्यात आले.

ही तर चिवडा पार्टी

भाजप तर चिवडा पार्टी होती. त्यांच्याकडे इतका पैसा अचानक आला कोठून असा सवाल नाना पटोले यांनी केला. नोटबंदीच्या माध्यमातून भाजपने काळा पैसा जमा केला. त्यातून जमिनी खरेदी करण्यात आल्या. त्यावर पक्षाची कार्यालये बांधण्यात आली. त्यानंतर देशात राजकारण सुरु झाले अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली.

Published on: Sep 17, 2022 03:13 PM
Ajit Pawar: उद्योगांसाठी शिंदे सरकार पुढाकार घेत नाही- अजित पवार
Chandrakant Khaire | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम लवकर उरकल्यावरुन चंद्रकांत खैरेंची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड