पाच वर्षात दोन वेळा नोटबंदी! भाजपच्या निर्णयावर विरोधकांचे टीकास्त्र; पवार, राऊत यांच्यासह राज ठाकरे ही खवळले…
दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर आता भाजपवर विरोधकांकडून टीका होते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : 2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली. मात्र ही नोट काही सामान्यांच्या खिशात गेलीच नाही. त्यामुळे याचा आता शोध घेण्यासाठीच दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर आता भाजपवर विरोधकांकडून टीका होते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर मागे एकदा सरकारने सांगितलं की 500 आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? अशी टीका केली तर राज ठाकरे यांनी ‘यातून सरकारची धरसोड वृत्ती दिसून येते. आधीच तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती.’ असं सुनावलं आहे. तर तर मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहीजे. पंतप्रधान मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेले पाहीजे अशी राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे.