‘एका व्यक्तीकडून एवढं कसं काय धाडस होतंय…सरकार…,’ काय म्हणाले अजित पवार

| Updated on: Feb 25, 2024 | 9:44 PM

महानंद डेअरी कुठेही जाणार नाही. गोरेगावची ही जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. महानंद गुजरातच्या दावणी बांधली असा धादांत खोटा प्रचार होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करतेय असा आरोप होत आहे तो चुकीचा आहे. एनडीडीबी संस्था देशातील नावाजलेली संस्था आहे. एनडीडीबीला जळगावचा दूध संघ चालवायला दिला होता. नंतर तो फायद्यात आल्यावर परत दिला असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : आपण काहीही बोललं तर खपतं असं कुणी समजू नये. समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करु नये, कलेक्टर, एसपी असतील त्यांना शिवराळ करणे, एक व्यक्ती एवढं धाडस करणार नाही. त्याच्या मागे नक्की कोण आहे याबाबत माहीती घ्यायला लागेल. त्याबाबत सरकार योग्य ती भूमिका घेईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. बिहारने जसे आरक्षण वाढवले आहेत.त्याच धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढविली आहे. एकूण आरक्षण 72 टक्क्यांपर्यंत गेले आहे. दूधाने तोंड पोळल्याने सरकार ताकही फुंकून पिते त्यादृष्टीने हे आरक्षण सर्व विचार करुन दिले आहे. सरकार जे काही करीत त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातून चार हजार कोटीचं ड्रग्ज पकडले तर त्याचं कौतूक करायचं सोडून विरोधक टीका करीत आहे. पुण्याचे नवे पोलिस आयुक्त आल्यानंतर ही कारवाई झाली. याची पाळेमुळे शोधली जात आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.
.

Published on: Feb 25, 2024 09:43 PM