कोल्हापूर महापालिका लवकरच मिळणार आयुक्त? अजित पवार यांनी काय केलीय घोषणा पाहा…
त्यांनी यावेळी हद्दवाढीबाबत आपल्या काही धोरणात्मक निर्णय हे पुढच्या ५० वर्षांचा विचार करून घ्यावा लागेल असे म्हणत शहरवासियांसह ग्रामिण जनतेला आवाहन केलं. ते कोल्हापूर येथे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनासाठी आले होते.
कोल्हापूर, 15 ऑगस्ट 2023 | कोल्हापूर शहर हद्दवाढ हा प्रश्न महत्वाचा असतानाच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी हद्दवाढीबाबत आपल्या काही धोरणात्मक निर्णय हे पुढच्या ५० वर्षांचा विचार करून घ्यावा लागेल असे म्हणत शहरवासियांसह ग्रामिण जनतेला आवाहन केलं. ते कोल्हापूर येथे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनासाठी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणानंतर त्यांनी आपल्या भाषणात आणखी एका विषयावर मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे कोल्हापूर शहरवासियांना दिलासा देणारं आहे. अजित पवार यांनी यावेळी कोल्हापूर महापालिकेला आयुक्त नसल्याने कलेक्टर यांच्यावर कामाचा ताण येत आहे. तर शहराचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत ठिक नसल्याने काही दिवस द्या. पुढच्या काहीच दिवसात महापालिकेला एक चांगला आयुक्त देऊ अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे कोल्हापूर महानगरपालिकेला लवकरच आता आयुक्त मिळणार आहे.