पालकमंत्री नाराजीनाट्यावर अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, ‘अरे काय हे, क्षुल्लक कारणाचा…’

| Updated on: Aug 12, 2023 | 12:13 PM

अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नसल्याने तेथील जबाबदारी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्यांकडे दिली आहे. तर पुण्यावरून पेच निर्माण झाला होता. आधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुण्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती.

पुणे, 12 ऑगस्ट 2023 | देशाच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने होणाऱ्या ध्वजारोहणावरून सध्या राज्यात जोरदार वाद रंगला आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नसल्याने तेथील जबाबदारी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्यांकडे दिली आहे. तर पुण्यावरून पेच निर्माण झाला होता. आधी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पुण्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला असून पुण्यातील ध्वजारोहण हे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील दोन दादांमध्ये राजकारण पेटल्याची तर दोन्ही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उत आलं होतं. त्यावरून आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार यांनी, अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. तर 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि 26 जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात असे ते म्हणाले. तर याच्याआधी मी, गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांनीही ध्वजारोहण केलं आहे. पण आता नाराजीच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. फक्त क्षुल्लक कारणाचा बाऊ केला जातोय. कुणाचा रुसवा, फुगवा? कुणी तुम्हाला सांगितलं. कुणी रूसून, फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

Published on: Aug 12, 2023 12:06 PM
सामनातून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदी यांच्या आगपाखड; ‘मोदी हे सूर्याचे मालक नाहीत, 2024 ला त्यांचा सूर्य…’
‘उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये’; वड्डेटीवार यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका?