Video | नक्कल केल्याने दादा चांगलेच भडकले, राऊतांना सोम्या गोम्या म्हणाले

| Updated on: Jan 01, 2024 | 10:03 PM

अजित पवार यांची नक्कल करीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टिका केल्यानंतर अजितदादा संतापले आहेत. आज त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता कुणा सोम्या-गोम्याच्या टिकेला मी उत्तर देत नसतो असे अजितदादा यांनी म्हटले आहे. अजित पवार फुटल्यापासून त्यांच्यावर संजय राऊत सातत्याने टिका करीत आले आहेत.

मुंबई | 1 जानेवारी 2023 : शेतकरी आक्रोश मोर्चाचा समारोप करताना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा आवाज हुबेहुब काढीत त्यांची टेर खेचली, हवा बहोत तेज अजितदादा टोपी उड जाएगी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आमच्या पाडा पाडीत तुम्ही पडाल तर तुम्हीच पडाल असा इशारा राऊत यांनी अजितदादांना दिला. त्यावर अजित पवार यांना आज प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कुणा सोम्या गोम्याच्या टीकेला मी उत्तर देत नसतो असे त्यांनी म्हटले आहे. महाआघाडीतून अजित पवार बाहेर पडण्याची कुणकुण लागल्यापासून संजय राऊत सातत्याने अजितदादांवर टीका करीत आहेत. अजित पवार यांनी यापूर्वी देखील संजय राऊत यांना सोम्या-गोम्या म्हटले आहे. पाहा सविस्तर बातमी…

Published on: Jan 01, 2024 10:03 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीत चुरस, किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने गोंधळ
नव्या वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक, अनेक ठिकाणी संप; काय आहे ‘हिट अँड रन’ प्रकरण?