‘बुकी’ अनिल जयसिंघानी याला जामीन नाही; मुलीला जामीन, मलाही द्या अशी केली होती मागणी
'बुकी' अनिल जयसिंघानीला याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 20 मार्च रोजी जयसिंघानी यांना गुजरातमधून अटक केली होती
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं. यानंतर याप्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाला अटक करण्यात आली होती. ‘बुकी’ अनिल जयसिंघानीला याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 20 मार्च रोजी जयसिंघानी यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर जयसिंघानी याने न्यायालयात धाव घेत जामीन मिळावा अशी याचिका केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याप्रकरणात सहआरोपी असणाऱ्या अनिक्षाला याच्याआधीच जामीन देण्यात आला आहे. त्याप्रमाणे आपल्यालाही जामीन मिळावी अशी विनंती ‘बुकी’ अनिल जयसिंघानी याने न्यायालयाकडे केली होती.
Published on: Apr 03, 2023 12:05 PM