Devendra Fadnavis : प्रकरण 2014 सालचं, फडणवीस यांना कोर्टाची पायरी 2023 मध्ये चढावी लागणार

| Updated on: Apr 15, 2023 | 2:12 PM

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी एका प्रकरणाची माहिती लपवल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागणार आहे

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यालायलयाची पायरी चढावी लागणार आहे. याबाबत बातमी येताच भाजपसह राज्यात खळबळ उडाली आहे. तर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी एका प्रकरणाची माहिती लपवल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित राहावे लागणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना आज 15 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागणार आहे. मात्र राज्यातील विविध कामांकडे पाहता त्यांचे वकील बाजू मांडू शकतात, असेही सांगितलं जाते. याप्रकरणी अॅड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार केली होती.

Published on: Apr 15, 2023 02:12 PM
नाराज असण्याच कारणच नाही, याच्याआधीच स्पष्टीकरण दिल आहे; कोल्हे यांचे नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण
मविआत तारतम्यच नाही, त्यामुळे वज्रमुठीतील एक-एक बोट उघडायला लागलंय; कुणाचा घणाघात?