‘पोटात दुखत असल्यानेच आता काही लोक रोज पत्र लिहितात’, उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी केली टीका
तर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतील विकास कामांवरून निशाना साधला होता. त्यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून भाजपसह शिंद गटाला तसेच शिंदे-भाजप-पवार सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतील विकास कामांवरून निशाना साधला होता. त्यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी ठाकरे पिता पुत्रावर टीका करताना, सध्या मुंबईत चांगली कामं सुरू आहेत. त्यामुळे काही लोकांच्या पोटात रोज दुखतं आणि ते रोज एक पत्र लिहितात. तर असंच पत्र त्यांनी स्वत: ला २५ वर्ष लिहलं असतं तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती असा टोला लगावला आहे.
Published on: Aug 09, 2023 11:59 AM