Devendra Fadnavis : आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया – फडणवीस
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. भाजपचं सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि महाराष्ट्रात बारामतीचा समावेश होतो असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. भाजपचं सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि महाराष्ट्रात बारामतीचा समावेश होतो असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.