VIDEO | ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची फडणवीस, सांभाळा! सामनाच्या अग्रलेखातून बोचरी टीका

| Updated on: Aug 19, 2023 | 10:36 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्यावर निशाना साधताना ते अहंकाराचे महामेरू बनल्याचा घणाघात करण्यात आला आहे.

मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेत ते आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली. यामुळेच ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केल्याची देखील टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. तर फडणवीस यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेची असून ते अर्धग्लानी अवस्थेत आहेत. रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची त्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा! अशी टीका देखील यावेळी करण्यात आली आहे.

Published on: Aug 19, 2023 10:36 AM
VIDEO | ‘अंधारे पॉलिटीकली स्टंटबाजी करतात’, शिंदे गटाच्या महिला नेच्याची खरमरीत टीका
VIDEO | मुख्य खुर्चीच बदलणार? वडेट्टीवार यांनी थेट खुर्ची बदलाची डेड लाईनच सांगून टाकली