Amol Mitkari | ‘मंत्रिपदासाठी शिंदे गट,भाजप नेते फडणवीसांना खूश करत आहेत’-tv9
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून राणा दांपत्याला खोचक टोला लगावला आहे. तसेच रावणादांपत्यावर टीका करताना मिटकरी यांनी म्हणाले, मंत्रीपदासाठी शिंदे गट आणि भाजप नेते, भाजपचे आमदार हे फडणवीस यांना खुश करत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रक्ततुले वरून आता राजकारण होत असल्याचे तसेच टीका ही होत असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून राणा दांपत्याला खोचक टोला लगावला आहे. तसेच रावणादांपत्यावर टीका करताना मिटकरी यांनी म्हणाले, मंत्रीपदासाठी शिंदे गट आणि भाजप नेते, भाजपचे आमदार हे फडणवीस यांना खुश करत आहेत. त्याचबरोबर शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांची निष्ठा ही संपल्याची टीका ही अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमरावतीमध्ये दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस यांची रक्ततुला होणार आहे. त्यावरून मिटकरी यांनी हे सगळ फक्त मंत्रीपदाच्या लॉबिंग करता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा करत आहेत.
Published on: Aug 21, 2022 01:19 PM