उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत रॅली
नागपूर, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात आले. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळ ते त्यांच्या निवास स्थानापर्यंत स्वागत रॅली काढली. फडणवीस यांचे सकाळी अकरा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. तत्पूर्वी भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संख्यने ढोलताशासह विमानतळावर पोहोचले होते. नागपूर शहर भाजपच्या वतीने नेत्यांनी हार व पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचे विमानतळावर स्वागत केले व त्यानंतर फडणवीस […]
नागपूर, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात आले. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विमानतळ ते त्यांच्या निवास स्थानापर्यंत स्वागत रॅली काढली. फडणवीस यांचे सकाळी अकरा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. तत्पूर्वी भाजपचे कार्यकर्ते प्रचंड संख्यने ढोलताशासह विमानतळावर पोहोचले होते. नागपूर शहर भाजपच्या वतीने नेत्यांनी हार व पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचे विमानतळावर स्वागत केले व त्यानंतर फडणवीस एका रथावर स्थानापन्न झाले. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गात लोक दुतर्फा उभे राहून फडणवीस यांचा जयजयकार करताना दिसत होते. कार्यकर्त्ये त्यांच्या समर्थनात घोषणा देत होते. स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर स्वागतद्वार, बॅनर्स लागलेले होते. बॅनर्सवर फडणवीस यांचा उल्लेख देवमाणूस असा करण्यात आला आहे. यानंतर धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी जाहीर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.