Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्रात सचिवालय नाही, फक्त मंत्रालय आहे’-tv9
ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय घेताना, काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते.
राज्याच्या अधिवेशनात सचिवालय की मंत्रालय हा मुद्दा चर्चेत पुन्हा एकदा आला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले. तसेच ते म्हणाले, या संदर्भात आधीच संबंधीत मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय घेताना, काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते. त्यावरून राज्यात जोरदार राजकारण झाले होते. त्यावरून पुन्हा एकदा हा प्रश्न अधिवेशनात समोर आला. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय असल्याचे सांगितले.
Published on: Aug 18, 2022 04:21 PM