राणेंनी अपशब्द वापरला त्यांना अटक झाली, मग फडतूसवरून ठाकरेंना अटक करा; शिवसेना नेत्याची मागणी
ठाकरे हे फडतूस म्हणाले, आणखी काय काय बोलले. इतरांनी कुणी एक बोललं तर त्यावर ताबडतोब कारवाई होते. त्यामुळे राज्य शासनाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडतूस असे म्हणत टीका केली होती. त्यावरून राज्यात आधीच मोठा गदारोळ झाला आहे. ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केल्या आहेत. यानंतर आता शिवसेना नेत्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटक करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर ही मागणी एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी केली आहे. तर कंगना राणावत आणि केतकी चितळे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वागणुकीमुळेच मातोश्रीला शाप लागला, असेही पावसकर म्हणालेत.
ठाकरे हे फडतूस म्हणाले, आणखी काय काय बोलले. इतरांनी कुणी एक बोललं तर त्यावर ताबडतोब कारवाई होते. त्यामुळे राज्य शासनाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी. त्यांना पण अटक करावी. त्यांच्या काळात नारायण राणे यांनी उपशब्द वापरला म्हणून जेवणाच्या ताटावरून उचलत अटक केलीत आता तर ते केंद्रीय मंत्री आहेत. तर त्यांना अटक होऊ शकते. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना बोलल्याबद्दल ठाकरे यांना अटक व्हावी. न्याय हा सगळ्यांना समान हवा. एकास एक आणि दुसऱ्याला दुसरा असा नको.