Devendra Fadnavis | आमच्यामध्ये खात्यावरून कोणताही वाद नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | आमच्यामध्ये खात्यावरून कोणताही वाद नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 14, 2022 | 8:44 PM

आमच्यात खात्याबद्दल कुठलाही वाद नाहीये. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. योग्य वेळ पाहून ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नागपूर : खाते वाटप करणे हे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी खातेवाटप केला आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री जे जे खाते आम्हाला मिळाले आहे, त्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. अजूनही हे अर्ध्यापेक्षा कमीच मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. पुढील विस्तारात आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. जे खाते आमच्याकडे आहेत आणि जे खाते शिंदे गटाकडे अतिरिक्त आहेत. ते त्या त्या पक्षातील भविष्यात येणाऱ्या मंत्र्यांना मिळतील. खात्यात अदल बदल करायचे असल्यास आम्ही चर्चा करून ते करू. आमच्यात खात्याबद्दल कुठलाही वाद नाहीये. विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. योग्य वेळ पाहून ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Published on: Aug 14, 2022 08:44 PM
Eknath Khadse : नगरविकास सोडल्यास महत्त्वाचे खाते भाजपकडे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला नव्हताच, भाजपसोबतच बेईमानी झाली होती : फडणवीस