जेव्हा अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले; पाहा राहुल नार्वेकर यांनी काय केलं…
आज मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी एका प्रसंगाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | आज मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. मात्र या कार्यक्रमाच्या वेळी एका प्रसंगाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज मनोरा आमदार निवास भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि इतर आमदार उपस्थित होते. अजित पवार स्टेजवर पोहोचतात अनवधानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मध्यभागी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्यास सांगितलं. कारण एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याआधी राहुल नार्वेकर यांनी त्यावरील स्टिकर काढून टाकला.
Published on: Aug 03, 2023 12:22 PM