आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिवसेना नेत्याची टीका; म्हणाला, ‘ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये… त्यामुळे…’

| Updated on: Jul 08, 2023 | 3:52 PM

याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांनी 'सध्या त्यांचे खेळ सुरु आहेत असे म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून टीका केली होती.

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांनी ‘सध्या त्यांचे खेळ सुरु आहेत असे म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी, आमचे आमदार परत येत आहेत. त्याबाबत इकडून तिकडून निरोप येत आहेत. तर सध्या राज्याच्या राजकारणात स्वार्थी विरूद्ध प्रामाणीक असा लढा सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून मंत्री संदिपान भूमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करताना, मनिषा कायंदे असून द्या किंवा नीलम गोऱ्हे यांच्यासह अजून काही आमदार हे अस्वस्थ आहेत. तर उदय सामंत यांनी यावर बोलताना लवकरच आता ठाकरे गटातून आणखी 7 ते 8 आमदार शिंदे गटात येतील.

Published on: Jul 08, 2023 08:52 AM
‘काल तर त्यांची मस्त पंचाईत झाली’, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला
शरद पवार यांच्या वयावरून राजकारण तापलं; फडणवीस यांचे आरोप; म्हणाले, ‘योग्य नाही…’