असं काय घडलं? धुळे पोलीसांना धार्मिक स्थळाकडे धाव घ्यावी लागली?; लावला मोठा पोलीस बंदोबस्तही
कोल्हापुरात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्सवरून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. याचदरम्यान आता धुळ्यातील मोगलाई परिसरामध्ये पांझरा नदी किनारी असलेल्या एका धार्मिक स्थळी विटंबना झाल्याचा धक्कादाय प्रकारासमोर आला आहे.
धुळे : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तर कोल्हापुरात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्सवरून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. याचदरम्यान आता धुळ्यातील मोगलाई परिसरामध्ये पांझरा नदी किनारी असलेल्या एका धार्मिक स्थळी विटंबना झाल्याचा धक्कादाय प्रकारासमोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतळी. तर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होत, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जमलेल्या जमावाला शांत करत, त्यांची समजूत घातली. या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन केले आहे. तर अफवा पसरवणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे संकेतही पोलीस दिले आहेत. या विटंबने प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, तसंच दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली जाईल असे आश्वासनही पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे. सद्यस्थितीत शहरात शांतता कायम आहे.