ताम्हिणी घाटातील तुषाराचं वैभव, ट्रॅफीक जाम होऊनही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Jul 25, 2024 | 7:07 PM

ताम्हिणी घाटात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे रायगड ते पुण मार्गावर असलेल्या या ताम्हिणी घाटात धबधब्याचे सौदर्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Follow us on

रायगड – पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळण्याच्या दोन ते तीन घटना झाल्याने येथील महामार्ग बंद झालेला आहे. तरीही पर्यटकांना येथे सणसवाडी येथील कुंभे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकाची मोठी गर्दी होत आहे.या धबधब्याचे सौदर्य पाहण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होत असते. येथील ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासांत 500 मिमी पावसाने दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.ताम्हिणी घाटातील कुंभे धबधबा पाहण्यासाठी आलेल्या सोशल मिडिया इन्फ्लुअर्स तन्वी कामदार हीचा पाय घसरल्याने तीनशे फूट दरीत कोसळून दुर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे येथे कलम 144 देखील लागू करण्यात आले आहे. तरीही लोक मार्गावर कार थांबवून धबधब्याचा आनंद घेत आहेत. काही पर्यटक तर सोलापूर, नांदेड येथून आल्याचे उघडकीस आले आहे.