काहीही असो मविआ एके मविआ

काहीही असो मविआ एके मविआ

| Updated on: Jun 12, 2022 | 8:21 PM

राज्यसभा उमेदवारांच्या निवडीनंतर राज्यात मतदान नाट्य घडत आहे. महाविकास आघाडीच्या संजय पवार निवडून आले नसल्याने अपक्ष आमदारांचा घोडेबाजार झाला असल्याचे संजय पवार यांनी अपक्ष आमदारांवर टीका केली.

राज्यसभा उमेदवारांच्या निवडीनंतर राज्यात मतदान नाट्य घडत आहे. महाविकास आघाडीच्या संजय पवार निवडून आले नसल्याने अपक्ष आमदारांचा घोडेबाजार झाला असल्याचे संजय पवार यांनी अपक्ष आमदारांवर टीका केली. त्यावनंतर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांना मतदानाविषयी सविस्तर सांगितले आहे. त्यांच्या भेटीनंतर आता खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार असल्याचे सांगितले.

Published on: Jun 12, 2022 08:21 PM
Sujay Vikhe on Shivsena | अहमदनगरमध्ये शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही
राज ठाकरेंकडून मनसैनिकांना नवा आदेश