ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीस यांचं टीकास्त्र; म्हणाले, ठाकरे कुणासोबातही बसायला तयार!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची पुन्हा मातोश्रीवर भेट घेतली. लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे-केजरीवाल यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची पुन्हा मातोश्रीवर भेट घेतली. लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे-केजरीवाल यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केजरीवाल आणि ठाकरे यांच्या भेटीचा मला अतिशय आनंद आहे.भाजपला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशीही काँप्रोमाईज करायला तयार आहेत, तर उद्धव ठाकरे कुणाच्याही बाजूला बसायला तयार झालेत. यातचं भाजपची ताकद दिसून येतेय. याआधीही असा प्रयत्न केला होता,पण त्याचा काही उपयोग झाला नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.”नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं जपत असतो”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.