शिवसेनेच्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचं सरकार तकलादू…”
शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या संपूर्ण चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला आहे.
पालघर: शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या संपूर्ण चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये आहेत. तिथे बोलताना उपमुख्यमंत्री यांनी या जाहिरातीचा उल्लेख केला. “मी आणि मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने उतरल्यावर एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही एकत्र प्रवास केला कसं वाटतंय? अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षापासूनचं आहे.आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. आमचं सरकार महाविकास आघाडीपेक्षा जास्त घट्ट आहे. कोणत्याही जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. जाहिरातीने पडावं एवढं आमचं सरकार तकलादू नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.