‘लाडकी बहीण योजना खोटी म्हणतात आणि मतदार संघात स्वत:चे..,’काय म्हणाले फडणवीस

| Updated on: Jul 21, 2024 | 2:53 PM

भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन पुण्यात सुरु आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या अधिवेशनाला उपस्थित राहीलेले नाहीत. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केले आहे.

भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन पुण्यात सुरु आहे. महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना खोटी असल्याचा आरोप विरोधक करीत असतात. परंतू आपल्या मतदार संघात या योजनेचे स्वत:चे पोस्टर लावतात अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपाचा सरकारच्या सर्व योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या. जलयुक्त शिवार योजना, पंतप्रधान निवास योजना या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या. मेट्रोचे काम बंद पाडले. आणि आता यांचे लोक ‘लाडकी बहीण योजना’ खोटी म्हणत होते. आता मतदार संघात महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. मला वाटते हे लोक नुसते फॉर्म भरुन घेणार आणि ते सरकारपर्यंत पाठवविणारच नाहीत, स्वत:कडे ठेवून घेतील आणि माता भगिनींना पैसे मिळाले नाही की आमची योजना खोटी आहे असा आरोप करतील असाही आरोप आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Published on: Jul 21, 2024 02:13 PM
राज्याला पावसाने झोडपले, चंद्रपुरात अंधारी नदीच्या पुरात अडलेल्याची सुटका
‘तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी…,’ काय म्हणाले प्रसाद लाड