Special Report : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची टोलेबाजी, फडणवीस म्हणतात, आमदार झालो तर रिस्क कोण घेईल?

| Updated on: Sep 03, 2022 | 9:36 PM

मला मुख्यमंत्री असताना पुणे फेस्टिव्हलमध्ये बोलावलं होतं. पण, तेव्हा निघालो आणि पोहचता पोहचता उपमुख्यमंत्री झालो. पण, मंत्र्याचा आमदार झालो तर कोण धोका पत्करेल. म्हणून मंच सोडून जाण्यासाठी परवानगी घेतल्याचं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात तुफान टोलेबाजी केली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद गेल्यामुळं तर, फडणवीसांनी स्वतःला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्यामुळं टोले लगावलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या भेटीगाठींचा सपाटा लावलाय. निमित्त आहे नेत्यांच्या घरच्या गणपतींचं दर्शन. गणपती दर्शनाला जाताना कॅमेरे घेऊन जाण्याची गरज काय, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. हे झालं अजित पवार यांचे काल सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केलेलं वक्तव्य मिश्किल होतं की, आपल्या मनातली खंत बोलून दाखवायची होती. हे फडणवीसचं सांगू शकतील. खरं म्हणजे मला मुख्यमंत्री असताना पुणे फेस्टिव्हलमध्ये बोलावलं होतं. पण, तेव्हा निघालो आणि पोहचता पोहचता उपमुख्यमंत्री झालो. पण, मंत्र्याचा आमदार झालो तर कोण धोका पत्करेल. म्हणून मंच सोडून जाण्यासाठी परवानगी घेतल्याचं ते म्हणाले.

 

Published on: Sep 03, 2022 09:36 PM
मुंबईत महापालिकेत शिवसेनेचे किती नगरसेवक निवडून येणार? पेंडणेकर म्हणतात, आमचा नारा 150 चा…
Worli | वरळीत पोस्टरबाजीवरून ठाकरे-शिंदे गटात वातावरण तापलं