काँग्रेस फुटणार? देवेंद्र फडणवीस यांचा दावा, तर बच्चू कडू म्हणतात, “प्रभावामुळे एकही पक्ष…”

| Updated on: Jul 17, 2023 | 9:11 AM

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या चर्चा भाजपच्या गोट्यातून येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अख्खी काँग्रेस आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. तर बच्चू कडू यांनी देखील काँग्रेस फुटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

सांगली, 17 जुलै 2023 | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटीच्या चर्चा भाजपच्या गोट्यातून येत आहेत. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेस फुटीचा दावा केला आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेस फुटीच्या चर्चांवर महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “अतिशय वैफल्यग्रस्त असा विरोधीपक्ष मी कधीच पाहिलेलं नाही. आज देशामध्ये ही तीच परिस्थिती आहे. हळू हळू अख्खी काँग्रेस आपल्यासोबत येणार.” देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शिंदे-फडणवीस सरकारचा हा दरारा आहे. त्यांच्या प्रभावापुढे महाराष्ट्रात एकही पक्ष राहणार नाही.”

Published on: Jul 17, 2023 09:11 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
‘हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित’ असं म्हणत विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार