देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल; अमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्यासोबत होणार महत्त्वाची बैठक
एकीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी उद्धव ठाकरेंना आज शेवटचा अल्टिमेटम दिल्यानंतर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. अमित शाह आणि जेपी नड्डा या बड्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक हॊणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मात्र त्यांच्या पुढच्या रणनीतीबद्दल कुठलाच खुलासा केला नाही. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघता सत्ता स्थापनेच्या […]
एकीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी उद्धव ठाकरेंना आज शेवटचा अल्टिमेटम दिल्यानंतर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. अमित शाह आणि जेपी नड्डा या बड्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक हॊणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मात्र त्यांच्या पुढच्या रणनीतीबद्दल कुठलाच खुलासा केला नाही. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघता सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आठ दिवसांपासून सुरु असलेले सस्पेन्स राजकीय नेत्यांसोबतच सर्वसामान्यांसाठीही चर्चेचा विषय ठरत आहे.
Published on: Jun 28, 2022 03:05 PM