महापालिका निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात मोठे संकेत
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीचे संकेत दिले आहेत.तर 'हे वर्ष निवडणुकांचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने रांगेने निवडणुका होतील' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीचे संकेत दिले आहेत.तर ‘हे वर्ष निवडणुकांचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने रांगेने निवडणुका होतील’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा जूनमध्ये येईल. जर हा निकाल जून जुलैमध्ये आला, तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूका लागतील. तर चंद्रकांत पाटील यांनी देखील निवडणुकांवर भाष्य केलं आहे. ‘महापालिका, विधनासभा, लोकसभा निवडणुकीचे हे वर्ष आहे. महानगरपालिका जर जिंकायची असेल तर आता बाहेर पडले पाहिजे’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या संकेतानंतर आता महापालिका निवडणुका कधी लागतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका झाल्या आणि उत्तर प्रदेश देशातला सगळ्यात मोठे राज्य आहे. 60 जागांचं 80 जागांच राज्य आहे. असं म्हणतात तिथे जो उत्तर प्रदेश जिंकतो तोच भारत जिंकतो. त्या उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. भाजपने स्वतःचा रेकॉर्ड तोडला आहे. महापौर हे भाजपचे निवडून आले, असेही फडणवीस म्हणाले.