“आदित्य ठाकरे यांनी डोळ्याला पट्टी बांधली, अशांना उत्तर देऊन…” देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
बारसू रिफायनरीविरोधी आंदोलनावरून आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवी यांच्यामध्ये वार-पलटवार सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनी आंदोलन करणार असलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
नाशिक, 5 ऑगस्ट 2023 | सरकारकडून बिलंब झाल्याने सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. बारसू आंदोलनताील काहींच्या खात्यावर बंगळुरूतून पैसे आले होते, असा आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या बारसू, आरेत आंदोलन करणारच, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहेत. ते म्हणाले की, “किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील, असं मला वाटत होते. पण, आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधलीय आणि विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?”
Published on: Aug 05, 2023 11:46 AM