ठाकरेंचा शिंदेंवर वार, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, “…म्हणून त्यांचं दुकान बंद केलं”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असा टोला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते काल ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलत होते.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असा टोला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते काल ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलत होते. “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हालाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. भाजपच्या महाजनसंपर्क सभेत देवेंद्र फडणवीस यांनी “बाळासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान बंद करीन, उद्धव ठाकरे गेले म्हणून आम्ही त्यांचं दुकान बंद केलं”, घणाघात केला.
Published on: Jun 19, 2023 10:11 AM