“शिवसेना आपल्याकडे, ठाकरेंकडे शिल्लक सेना”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिल्लक सेना आहे. ती शिल्लक सेनाच आहे. खरी शिवसेना आपल्याकडं आहे. हे तीनही पक्ष एकत्रित आले, तरीही भाजपा-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील. कारण, अडीच वर्षाचा कारभार जनतेने पाहिला आहे.अडीच वर्षे मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाहीत. हे मी म्हणत नाही. शरद पवार यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. ‘अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनच वेळा मंत्रालयात गेले. यामुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी आहे,’ असेही शरद पवारांनी पुस्तकात सांगितलं”, असं फडणवीस म्हणाले.